अमळनेर - येथील पैलाड भागातील कोंडाजी व्यायाम शाळेतर्फे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही मकर संक्रांतीच्या दिवशी दि.१५ रोजी दुपारी दोन वाजता बोरी नदीच्या पात्रात कुस्त्यांची भव्य ओपन दंगल भरणार आहे. यावेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील ,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आदींसह अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दंगलीत विजयी पैलवानांना देण्यासाठीच्या अनेक बक्षिसांचे प्रायोजक मंगळग्रह सेवा संस्था आहे. दंगलीच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक संजय पाटील व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.



