अमळनेर - पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी त्रिवेनाबाई शिवदास काटे (वय- ६२) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.१४) सकाळी ९ वाजता कोळपिंप्री येथील राहत्या घरापासून निघणार आहे.त्या माजी उपसरपंच तथा फ्रुट सेल सोसायटीचे माजी उपाध्यक्ष शिवदास भगा काटे यांच्या पत्नी तर दिनेश काटे यांच्या आई होत.


