भाजपा अमळनेर शहर व तालुका अध्यक्षांच्या नावाची घोषणा तालुका अध्यक्षपदी हिरालाल पाटील तर शहराध्यक्षपदी उमेश वाल्हे यांची निवड

अमळनेर -
  भारतीय जनता पार्टीच्या अमळनेर शहर व तालुकाध्यक्ष पदांची घोषणा आज करण्यात आली. यात  तालुकाध्यक्षपदी दहिवद खुर्दचे माजी सरपंच व विद्यमान सरचिटणीस हिरालाल पाटील यांची तर शहराध्यक्षपदी विद्यमान सरचिटणीस उमेश वाल्हे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तालुक्यातुन अनेक कार्यकर्त्यानी या दोन्हीही  पदांसाठी मुलाखती दिल्या होत्या. स्थानिक पातळीवर झालेल्या बैठकीत कोणत्याही एका नावावर एकमत न झाल्याने ही निवड जिल्हा कोअर कमिटीने केली आहे, त्यांच्या या निवडीचे आमदार स्मिताताई वाघ आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.