अमळनेर - अवैध व बेकायदेशीर पद्धतीने वाळू वाहतूकीस प्रतिबंध करण्यासंदर्भात जिल्हयात १४४ कलम लागू केल्यानंतर काही दिवस अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीस चाप बसला असताना प्रशासनाच्याच ढिलाईमुळे माफियांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. आज पहाटे वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांच्या वाहनात गस्तीवर असणाऱ्या पथकाला वाळूच्या ट्रॅक्टरने धडक देऊन चक्क उडविण्याचा प्रयत्न केला.या घटनेने मुजोर वाळू माफियांबद्दल जनमानसात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ही घटना आज पहाटे अमळनेर तालुक्यातील खर्दे ते वासरे रस्त्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टरसह पावणे तीन लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी भानुदास शिंदे हे तलाठी स्वप्नील कुलकर्णी, गौरव शिरसाठ, केशव यांच्यासह चालक बाळकृष्ण जाधव यांना घेऊन तहसीलदारांचे वाहन क्रमांक एमएच १९ सीव्ही ४१८ घेऊन अवैध गौण खनिज चोरीला आळा बसवण्यासाठी गलवाडे जैतपिर परिसरात ८ रोजी रात्रीपासून गस्त घालत असताना ९ रोजी पहाटे खर्दे ते वासरे रस्त्यावर त्यांना समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर येताना दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९-८०७ वरील चालक भीमराव कैलास वानखेडे रा. चौबारी याने सरळ तहसीलदारांच्या वाहनांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. यात तहसीलदारांच्या गाडीचे १० ते १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. मंडलाधिकारी शिंदे यांनी मारवड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून भीमराव वानखेडे विरुद्ध शासकीय कामात अडथळा, मालमतेचे नुकसान, चोरी व अपघाताचा गुन्हा दाखल केला असून आरोपी वानखेडे याला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील २ लाख ७० हजार रुपयांचे ट्रॅक्टर, ट्राली वाळूसह जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला करीत आहेत.
तहसीलदारांच्या वाहनावर वाळूचे ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न अवैध वाळू वाहतूकदार आरोपी ट्रॅक्टरसह पोलिसांच्या ताब्यात
0
January 09, 2020