दगडी दरवाज्यावरची मांगीर बाबांची प्रतिकृती सुरक्षित जतन करावी-बहुजन रयत परिषदेची मागणी


अमळनेर -
शहरातील प्राचीन व इतिहास कालीन दगडी दरवाजा वाहतुकीच्या कारणास्तव  पाडल्यास अथवा दुरूस्त केल्यास तेथे असणारे मातंग समाजाचे दैवत मांगीर बाबा यांची प्रतिकृती पडून समाजाच्या भावना दुखावल्या जातील,त्यामुळे सदरच्या दगडी प्रतिकृतीचे नवीन जागेत स्थलांतर करावे अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्ष सौ.पुष्पलता पाटील,आणि अमळनेरचे उपविभागीय अधिकारी यांना बहुजन रयत परिषदेकडून निवेदन देण्यात आले.
   गेल्या अनेक वर्षापासून शहरातील वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या दगडी दरवाजाचा काही भाग पाडून टाकावा असा पहिला पर्याय सुचवण्यात आला असून या दगडी दरवाजाचे स्थलांतर करावे असा दुसरा पर्याय असून तेथे उड्डाण पूल तयार करावा असा तिसरा पर्याय काढण्याचे विचाराधीन असल्याचे समजते.यात जर पहिला पर्याय निवडला गेला तर हा दगडी दरवाजा बांधताना त्यावर मांगीर बाबांची प्रतिकृती प्राचीन काळापासूनच  उभारण्यात आली आहे. त्यामुळे सदरचा दगडी दरवाजा अनेकांचे श्रद्धास्थान आहे.
जर या दरवाजाचा पुढचा भाग काढला तर वाहतूक सुरळीत होईल पण प्रतिकृतीला हानी पोहचेल.जर सदर प्रतिकृती पडली तर पुन्हा तशीच प्रतिकृती तयार करण्यात यावी,तसेच दगडी दरवाजा स्थलांतर केला तर त्याठिकाणी मांगीर बाबा यांची प्रतिकृती सध्या जशी आहे तशीच तेथेही  त्यावर उभारण्यात यावी  अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.त्यानुसार आज बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी  न.पा.च्या नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील,माजी आमदार साहेबराव पाटील,प्रांताधिकारी सीमा अहिरे याना लेखी निवेदन दिले.याप्रसंगी बहुजन रयत परिषदेचेजिल्हा अध्यक्ष प्रकाश बोरसे,संजय मरसाळे,संजय वाघ,अनिल मरसाळे, निवृत्त पोलीस रमेश जाधव,कांतीलाल गरुड,गुलाब कढरे,दीपक गरुड,भैया गरुड, भाऊसाहेब जगदाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
--------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.