शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त फळवाटप, महाआरतीचे आयोजन शिवसेनेसह महाविकास आघाडीचा सहभाग

अमळनेर -
मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९३ वा जन्मदिवस हा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारींच्या हस्ते फळ, बिस्कीटे वाटप करून साजरा करणेत आला.
             आज मा.बाळासाहेबांचा ९३ वा वाढदिवस शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे,तालुकाप्रमुख विजू मास्तर,महाविकास आघाडीतील काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष गोकुळ आबा बोरसे,शहराध्यक्ष मनोज पाटील,दलितनेते रामभाऊ संदानशिव,पोलिस निरीक्षक अंबादास मोरे,पो.कॉ. शरद पाटील,खरेदीविक्री संघ अध्यक्ष विक्रांत पाटील, नगरसेवक श्याम पाटील, राजू फापोरेकर, शिवसेना शहरप्रमुख प्रताप शिंपी, तालुका संघटक संजय कौतिक पाटील, नितीन निळे,उपशहरप्रमुख जिवन पवार,उपतालुकाप्रमुख शिवकुमार पाटील, चंद्रशेखर पाटील, महिला आघाडीच्या सौ. संगीता शिंदे,सौ. मनिषा परब, सौ.उज्वला कदम,माजी उपजिल्हाप्रमुख नाना ठाकोर,देवेन्द्र देशमुख, व्यापारी सेनेचे जितेंद्र झाबक,वैद्यकीयआघाडीचे डॉ. शशिकांत सोनार, युवासेनेचे श्रीकांत पाटील,शहर संघटक चंद्रशेखर भावसार,रामचंद्र परब,गजानन भामरे,बोरसे टेलर, पाटील,रमा पाटील,महेंद्र कदम,विजय नवल पाटील, जगदीश आठवले,भरत जाधव,पी.एस.पाटील, शाखाप्रमुख, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शिवसैनिक उपस्थित होते, मा.बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी धुळे रोडवरील विजय मारोती मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यांत आले होते.
मोठ्या जल्लोषात व बाळासाहेब यांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला होता.
     महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आल्याने शिवसैनिक जोमात असून गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक व शासनाच्या सर्वसामान्य जनतेसाठीच्या कल्याणकारी योजना तळागाळातील शोषितापर्यंत पोहचवू व स्व.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे यांनी सदर प्रसंगी व्यक्त केला .
--------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.