अमळनेर - तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने घरपट्टी व पाणी पट्टीची वसुली करण्यासाठी थकबाकी दारांना नोटीसा दिल्या आहेत. दि.८ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी न भरल्यास ९ फेब्रुवारी पासून संबंधित थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल त्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन पथक स्थापन करण्यात येणार आहेत. ३१ मार्च पर्यंत ७०% करवसुली न करणा-या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचेवर पंचायत राज समितीच्या शिफारशी नुसार अपाञतेची कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. ग्रामसेवक यांचेवर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा व शिस्त कलम ३ व ४ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तरी सर्व थकबाकी दारांनी करभरणा करून पुढील कारवाई टाळावी असे आवाहन पं.स.चे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी केले आहे.



