शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद व्यापारी बांधव व पोलीस प्रशासन यांची विचार विनीमय सभा संपन्न

अमळनेर -
शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर काल रात्री किराणा दुकानदार व्यापारी महासंघ व पोलीस प्रशासन यांच्यात विचार विनीमय सभा सुजान मंगल कार्यालयात झाली.या सभेस मा.आ.साहेबराव पाटील,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्यासह व्यापारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. 

यावेळी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी पालिकेतर्फे दहा लाख रुपये तर वैयक्तिक पाच लाख रुपये जाहीर केले. कॅमेरा विशेषज्ञ दीपक काटे यांनी सुमारे २५ लाख रुपये खर्चाचा अंदाज दिला. उर्वरित रक्कम आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून मिळविण्याचे ठरले.व्यापाऱ्यांनीही आवश्यकता असल्यास आर्थिक योगदान देण्याचे जाहीर केले. यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे म्हणाले की, व्यापाऱ्यांनी मनातील भीती, न्यूनगंड व फिर्याद देण्याबाबतचा बाऊ काढून टाकावा. अन्याय अत्याचार झाल्यास कोणत्याही परिस्थितीत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवाच.  दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा वेळोवेळी दुरुस्त करा. चांगले कॅमेरा घ्या. दुकानासमोर रात्री लाईट सुरु राहू द्या. पोलीस आपले  मित्रच आहेत असे सांगितले व विविध प्रश्न व समस्यांचे निराकरण केले. 
व्यासपीठावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जेठमल जैन सचिव बिपिन शाह, कोषाध्यक्ष विवेक भांडारकर ,लालचंद सैनानी, डिगंबर महाले, उपस्थित होते. या सर्वांनी मनोगत व्यक्त केले. विवेकानंद भांडारकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सरजूशेठ गोकलाणी, प्रकाशचंद्र पारख, प्रदीप अग्रवाल,बापू हिंदूजा, रमेश जीवनानी,पप्पूशेठ सैनानी,श्यामदास लुल्ला अशोक माधवानी, राजकुमार बितराई, शंकर बितराई,अशोक हिंदुजा, हरेश आहूजा, प्रकाश जग्यानी, धर्मा सेनानी, दिलीप सेनानी, हरीसेठ आयलानी,घनश्याम थदानी.आदींसह  मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.