अमळनेरच्या तीन शिक्षकांचा उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्काराने गौरव नाशिक येथील क्रीडा साधना व दुधारे फाऊंडेशनतर्फे पुरस्कार

अमळनेर-
अमळनेर तालुक्यातील तीन क्रीडा शिक्षकांना नुकतेच नाशिक येथे क्रीडा साधना व दुधारे फाऊंडेशनतर्फे झालेल्या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑलिंपिक वीर कै. खाशाबा जाधव यांचे सुपुञ रणजीत खाशाबा जाधव यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
क्रीडा शिक्षकांचे कार्य
       शासनाच्या चला खेळूया,
फिट इंडिया,सीएम चषक, शालेय क्रीडा स्पर्धा,संत सखाराम महाराज द्विशताब्दी महोत्सव निमित्त स्पर्धा, आमदारचषक विभागीय कबड्डी स्पर्धा असो  की  विविध संस्था, राजकीय व्यक्तींकडून आयोजित मॅरेथॉन स्पर्धा असोत अमळनेर तालुका क्रीडा समितीचे तालुका समन्वयक सुनील वाघ,सचिव डी. डी. राजपूत,महेश माळी,संजय पाटील,निलेश विसपुते, के.यु .बागुल,संजय बोरसे,बाविस्कर यासह समितीचे सदस्यांनी  तत्परतेने, काटेकोरपणे आणि पारदर्शीपणाने स्पर्धा यशस्वी केल्या आहेत. त्याचाच परिपाक म्हणून नाशिक येथे झालेल्या क्रीडा साधना व दुधारे फाऊंडेशन  यांच्याकडून सन २०२०चा उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार तालुक्यातील क्रीडा शिक्षकांना देण्यात आला.
या शिक्षकांचा झाला गौरव
डी.डी.राजपूत ( शारदा माध्य.विद्यालय कळमसरे),  संजय कृष्णा पाटील (कै.अं.रा.
पाटील माध्य.विद्यालय मंगरूळ),के.यु.बागुल(माध्य.विदया.लोण ) या तिन्ही क्रीडा शिक्षकांना ऑलिंपिक वीर कै. खाशाबा जाधव यांचे सुपुञ रणजीत खाशाबा जाधव यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देण्यात आले.वरील तिन्ही शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.