अमळनेर - देव दगडात नसुन तो माणसांमध्ये आहे अशी शिकवण देणारे थोर संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधत युवा परिट धोबी मंडळाच्या वतीने अमळनेर शहरात भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन संत सखाराम महाराज संस्थानचे गादीपती ह.भ.प. प्रसाद महाराज यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करून मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी वाडी चौक, जुनी चावडी,दगडी दरवाजा, गाडगेबाबा चौक, गाडगेबाबा उद्याना पर्यंत रस्ता स्वच्छ करून दिपक वाल्हे सर यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सुशोभित रांगोळ्या काढल्या. त्यांना रवींद्र जाधव,गणेश नेरकर, ज्ञानेश्वर जाधव,अनिल मांडोळे, अनिल वाघ यांचे सहकार्य लाभले.



मिरवणुकीच्या अग्रभागी लहान बालिकांनी मराठमोळ्या वेशभूषा करून केशरी रंगाचे फेटे परिधान केले होते.जुनी चावडी परिसरात बबलू जाधव व आकाश जाधव मिञ परिवाराच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.संत गाडगेबाबा चौकात प्रा. डॉ.रमेश माने, सुरेशचंद्र येशी, भाजपाचे शहराध्यक्ष उमेश वाल्हे, विनोद जाधव,भरत जावदेकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या स्मारकाचे पूजन,माल्यार्पण व साप्ताहिक लढाऊ लेखणी या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. लढाऊ लेखणीचे अमळनेर प्रतिनिधी दिपक वाल्हे यांनी कार्यक्रमाचेे सुत्रसंचालन केले.

संत गाडगेबाबा उद्यानात मिरवणूकीतील सहभागी महिला वर्गाच्या हस्ते पूजन आरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अमृत जाधव, विजय वाघ सर, गोरख चित्ते, मोतीलाल जाधव, जगतराव निकुंभ सर, सतिष पवार, मधुकर निंबाळकर,अविनाश जाधव, गुलाबराव जाधव सर, परशुराम महाले,अरुण जाधव, गंगाराम वाल्हे, अनिल वाल्हे सर,एस. टी. सुर्यवंशी,योगेश शिंदे,भास्कर वाल्हे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------------------
![]() ओम टी पान मसाला च्या नविन दालन ![]() |



