अमळनेरचे युवा पुरस्कार्थी म्हणजे समाजासाठी आयकॉनच-आ.अनिल पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने युवा सन्मान पुरस्काराचे वितरण


अमळनेर-
तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने युवा सन्मान पुरस्कारासाठी ज्या १२ पुरस्कारार्थीची निवड केली ती योग्यच असून हे युवा पुरस्कारार्थी म्हणजे समाजासाठी विविध क्षेत्रातील आयकॉन असल्याची भावना आ.अनिल भाईदास पाटील यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी व्यक्त केली.
           महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसच्या वतीने संपूर्ण राज्यभरात युवा सन्मान पुरस्काराचे वितरण केले जात असून त्याअनुषंगाने अमळनेर येथे देखील विविध क्षेत्रातील १२  मान्यवरांना हा पुरस्कार वितरित करण्यात आला,हा सोहळा जी. एस.हायस्कुल अमळनेर येथील आयएमए हॉल मध्ये पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.अनिल पाटील तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे केंद्रीय सचिव सनी मानकर यांची होती.याप्रसंगी  मंचावर प्रा.अशोक पवार,जि.प. सदस्या सौ.जयश्री पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,प्रदेश समन्वयक सौ.रिता बाविस्कर,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,युवक अध्यक्ष बाळू पाटील,तालुकाध्यक्ष हर्षल पाटील,महिला शहराध्यक्ष आशा चावरीया,तालुकाध्यक्ष सौ.योजना पाटील,सौ.अलका पवार,मार्केट संचालक विजय प्रभाकर पाटील,
हमीद पठाण उपस्थित होते.
सुरवातीला विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाणे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.तसेच सनी मानकर यांनी युवकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळण्यासाठी हे पुरस्कार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.यानंतर जि. प. सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील,प्रा.अशोक पवार व ग्रंथालय सेलच्या प्रदेश समन्वयक सौ.रिता बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.आ.अनिल पाटील आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना म्हणाले की,युवकांच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचं चांगलं काम हे असल्याने मुंबई जाणे टाळून आवर्जून उपस्थित राहिलो,शरद पवार साहेबांनी घालून दिलेला हा आदर्श आहे,त्यांच्या मार्गदर्शनानेच विविध क्षेत्रातील युवाना सन्मानित करण्यात येत आहे,ही जबाबदारी जाणूनबुजून पवार साहेबांनी युवा संघटनेवर दिली आहे,पुरस्कारार्थी निवड करतांना मोठी कसरत आयोजकांची झाली.यासाठी त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते,परंतु त्यांनी योग्य व्यक्तींना स्थान दिले आहे.यापुढे प्रत्येक घटकास प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी १२ जानेवारीला युवा दिनानिमित्त चांगला कार्यक्रम घडवून पुरस्कार देण्याची घोषणा अनिल पाटलांनी केली.सत्कारार्थी मधून देखरेख संघाचे चेअरमन विक्रांत पाटील,कु.सायली किरण बडगुजर व रेहान जाकीर शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
यांना मिळाला पुरस्कार
राजकीय क्षेत्र-विक्रांत भास्कर पाटील(चेअरमन-देखरेख संघ)
सौ.प्रेरणा सुशील बोरसे,(लोकनियुक्त सरपंच-नगाव खुर्द)
सामाजिक क्षेत्र-सौ.भारती पाटील(आधार बहुउद्देशीय संस्था),योगेश महाजन(परिश्रम मतिमंद विद्यालय,पारोळा)
उद्योग-जितेंद्र भवरीलाल कटारिया(वरद कॉम्प्युटर)
अश्विन जैन(महावीर ग्रुप)
कृषी-निलेश गोपीचंद धनगर
दीपक जगतराव बागुल,मंगरूळ
गोपाल बागुल
पत्रकारीता-किरण लक्ष्मण पाटील,चेतन देवसिंग राजपूत(दैनिक जनवास्तव),चंद्रकांत शांतीलाल पाटील(पत्रकार दिव्यमराठी)
क्रीडा-सायली किरण बडगुजर(खेळाडू)रेहान जाकीर शेख(खेळाडू)
             सर्व पुरस्कारार्थीना आ. अनिल पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.तसेच यावेळी एस.पी.वाघ,क्रीडा संयोजक,अमळनेर व 
नितीन भदाणे-उत्कृष्ट रांगोळीकार आणि मंगेश महाजन यांचाही विशेष कर्तृत्वगुण म्हणून सत्कार करण्यात आला.सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील व शहराध्यक्ष सुनिल शिंपी यांनी केले होते.त्यांना सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विनोद कदम तर आभार सुनिल शिंपी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राहुल गोत्राळ, गौरव पाटील,अनिरुद्ध शिसोदे,अभिषेख धमाळ,निनाद शिसोदे,सनी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
---------------------------------------------------------------------------------

ओम टी पान मसाला च्या नविन दालन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.