अमळनेर - येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे आज महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे (पंढरपूर) यांचा समस्त अमळनेरकर व मंदिर व्यवस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ऑलिम्पिकमध्ये मोठे यश मिळावे यासाठी मान्यवरांनी शुभेच्छाही दिल्या. या सत्कार प्रसंगी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, नगरसेवक प्रताप शिंपी, मनोज पाटील,माजी नगरसेवक संजय पाटील,बाळा पवार,भरत पवार,संजीव भिला पाटील,शब्बीर पैलवान,आदिल पैलवान,रावसाहेब पाटील,जीवन पवार,मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी.
बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव व जयश्री साबे,सेवेकरी उज्वला शाह,आर.जे.पाटील,उमाकांत हिरे,राहुल पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.जमदाडे पैलवान यांनी मंदिरात विशेष पूजाही केली.
फोटो काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी
पिळदार शरीयष्टीचे जमदाडे पैलवान कुस्ती शौकिनांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यु ट्यूब वर त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कालच दि.२४ रोजी एरंडोल येथे इराणच्या बलदंड पैलवानाला एका मिनिटाच्या आत धूळ चारून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच हवा निर्माण झाली होती. तसेच गेल्या चार दिवसांपासून शहरात त्यांच्या स्वागताचे मोठं-मोठे बॅनरही लागले होते.या पार्श्वभूमीवर त्यांना पाहण्यासाठी मंदिरावर खास करुन व्यायामपटू व कुस्ती शौकिनांची खूप गर्दी झाली होती. मंगळवार निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भविकानीही त्यांचे जल्लोषात स्वागत केले.सुमारे दीड तास जमदाडे पैलवान यांच्या सोबत उपस्थितांचे फोटो व सेल्फी काढणे सुरू होते.
---------------------------------------------------------------------------------



