डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर एनआरसी,सीएए रद्द करा यासाठी बेमुदत साखळी उपोषण अनेक मान्यवरांनी दिला पाठिंबा

अमळनेर -
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर 
पुतळ्यासमोर देशाच्या एकतेला धोकादायक एनआरसी व सीएए रद्द करा या मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली.उपोषणाच्या पहिल्याच दिवशी माजी आमदार  कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्यासह शेकडो लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.
लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या माध्यमातून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरवात करण्यात आली.यावेळी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,दलित नेते रामभाऊ संदानशिव,प्रा.अशोक पवार,रियाज मौलाना,अॅड. शकील काझी,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,गौतम सपकाळे,नगरसेवक शेखा हाजी, विक्रांत पाटील,नगर सेवक नरेंद्र संदानशिव,नगरसेवक शे. सलिम शे. नगरसेवक संतोष लोहेरे,आदिवासी कार्यकर्ते पन्नालाल मावळे, प्रा.जयश्री साळुंखे,फैय्याज खान पठाण,अ. सत्तार शे. रमजान,नसिरोद्दीन हाजी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी हम सब एक है!हम सब भारतीय है।अश्या घोषणां आंदोलनकर्ते देत होते. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते गुलाम नबी,मुशिर शेख गयास,नावेद शेख,रमेश कलोसे, जहुर खान पठाण, आरिफ शेख, शराफत अली, शाकिर शेख,अखतर अली,शेख रफिक हाजी, देविदास बिऱ्हाडे, शेख मुख्तार , शफीयोद्दीन मोयोद्दिन,डबीर पठाण, सैय्यद हाफिज अली,कुतूबोद्दीन शेख, कालु शेख,जहुर खा पठाण,शेख इकबाल,रहीम अहमद,इम्रान शेख आदींसह मोठया संख्येने लोक दिवसभर सहभागी होत होते
जन आंदोलनास मदत
          प्रदीर्घकाळ चालणाऱ्या एनआरसी,सीसीए विरोधी या जन आंदोलनासाठी निधी म्हणून नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता पाटील यांनी एक महिन्याचे मानधन २० हजार रूपये मा.आ. कृषिभूषण साहेबराब पाटील यांचे मार्फत आंदोलनकर्त्यांना सुपूर्द केले. 
-----------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.