अमळनेर - गेल्या ६० वर्षांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळालेला नाही. गावातील प्रत्येक नोंदी व प्रत्येक कामात
या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. हा महत्त्वाचा घटक अगदी कमी मानधनावर
काम करत आहे. त्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन
आमदार अनिल पाटील यांनी दिले. मारवड (ता. अमळनेर) येथे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या
अमळनेर व पारोळा तालुका मेळाव्याप्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. पंचायत समितीच्या सभापती रेखाताई पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील,गटविकास अधिकारी संदीप वायाळ,ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश साळुखे,ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, मारवड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
आमदार पाटील म्हणाले,की माझी पक्षाच्या प्रतोदपदी निवड झाल्याने कोणत्याआमदाराला किती व कोणते प्रश्न मांडावयाचे आहेत याचे अधिकार मिळाले आहेत. त्यामुळेआपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्वच प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार आहोत असे सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की,ग्रा.पं.कर्मचा-यांच्या समस्या सोडविणे आवश्यक आहे.सरपंच संघटनेचे अध्यक्ष उमेश साळुंखे,कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील महत्वाचा प्रश्न असलेल्या शौचालय उभारण्यासाठी कठोर भूमिका घेणारे 
गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांचा आ.अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास अमळनेर व पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांचा आ.अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास अमळनेर व पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
---------------------------------------------------------------------------------



