शिक्षिका श्रीमती डॉ.सुरेखा बोरसे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

अमळनेर-
तालुक्यातील कावपिंप्री येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका डॉ.सुरेखा बोरसे यांना धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीतर्फे शिवजयंती निमित्त आयोजित यंदाच्या २०२० चा राज्यस्तरीय जाणता राजा शिक्षक रत्न पुरस्कार व राजमाता माँसाहेब जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दि.१९ फेब्रुवारी रोजी धुळे येथील पॉलिटेक्निकल कॉलेज गोंदूर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष राहुल एच.पाटील,धुळे जि.प. कृषी सभापती बापूसाहेब 
खलाणे, बो.वि.प्रसारक संस्थेचे संचालक तथा माजी प्राचार्य व्ही.एच.पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार श्रीमती डॉ.सुरेखा बोरसे यांना कला,क्रीडा, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,राजकीय विविध क्षेत्रात नैपुण्यता आणून विद्यार्थ्यांमध्ये व समाजात एक आदर्श निर्माण केल्या बद्दल दिला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनदंन होत आहे 
------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.