अमळनेर - येथील विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार तथा पक्षाचे विधिमंडळातील प्रतोद अनिल भाईदास पाटील यांचा उद्याचा जाहीर सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जाहीर केलेला असला तरी हा सत्कार सोहळा सर्वपक्षीय मान्यवरांकडून आयोजित करण्यात आला असून यात सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यानी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील व शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यानीं केले आहे .
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते तर सर्वपक्षीय नेते,पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या दि २२ रोजी दुपारी ३ वाजता मराठा मंगल कार्यालयात हा सत्कार सोहळा पार पडणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील उपस्थित राहणार आहे.
![]() |
राष्ट्रवादीसह काँग्रेस,रिपाई,शिवसेना यासह सर्व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम होणार आहे,या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून भूमिपुत्र आमदारांचा हा सत्कार सोहळा असल्याने मतदारसंघातील जनतेसह सामान्य कार्यकर्त्यामध्ये या सत्कार सोहळ्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह काँग्रेस,शिवसेना,यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,हितचिंक व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
----------------------------------------------------------------------------------




