पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून अभिनंदनाचा वर्षाव वाढदिवसाच्या विविध तारखांची सोशल मिडीयात चर्चा

अमळनेर -
येथील पोलीस निरीक्षक श्री अंबादास मोरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमीत्त पोलीस विभागासह प्रशासन व सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्री मोरे यांच्या वाढदिवसाची चर्चा समाज माध्यमातून सकाळी सुरू झाली. पण आज वाढदिवस नसल्याचेही चर्चिले जाऊ लागले. मग नेमका आज वाढदिवस आहे की नाही 
असा संभ्रम निर्माण होत असतांनाच आजच वाढदिवस असल्याचे समोर आले. तोपावेतो शुभेच्छा देणा-यांची रिघ लागली होती. श्री मोरे साहेब शुभेच्छांचा नम्रपणे स्विकार करत होते. 
" या " तीन तारखा
      श्री अंबादास मोरे यांच्या वाढदिवसाबद्दल तीन वेगवेगळ्या तारखांची चर्चा समाजमाध्यमातून 
रंगली होती. या तीनही तारखा त्यांच्या जीवनात महत्वाच्याच आहेत.त्या म्हणजे दि.३जानेवारी,२९ फेब्रुवारी व ३१ डिसेंबर या तारखा आहेत. श्री मोरे यांचा जन्म दि.२९ फेब्रुवारी रोजी झाला आहे. पण ही तारीख तीन वर्षांनी एकदा येते. तर कागदोपत्री त्यांचा जन्मदिवस दि.३ जानेवारी आहे. तर ते स्वतः मात्र दि. ३१ डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा करत असल्याचे चर्चेतून समोर आले. तोपर्यंत हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून अथवा फोनकरून व सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांचे मनापासून अभिष्ठचिंतन केले. अमळनेर पोलीस स्टेशनच्या सेवेतील अत्यंत कमी कालावधीत त्यांनी आपल्या कार्यपद्धतीची छाप जनमानसात निर्माण केली आहे त्याचे प्रत्यंतर आज पहायला मिळाले. 
 रक्तदानाचे पवित्र कार्य
  पोलीस निरीक्षक अंबादास मोरे    यांनी आज सायंकाळी रक्तदान केले. श्री मोरे यांच्या समवेत अजीज बोहरी,अतुल राजपूत,सौरव वैष्णव,विशाल जैन,पवन चौधरी,राहुल सोनार यांनीही जीवनश्री रक्तपेढीत रक्तदान केले. 
 शासन-प्रशासन व सामाजिक क्षेत्रांतील अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे.यावेळी मनोज शिंगाणे,योगेंद्र बाविस्कर,तुषार सोनार,शंकर पाटील,शुभम पाटील,पारस धाप, सागर विसपुते,दिनेश तेवर,गौरव पाटील,विशाल चौधरी,राहुल कंजर,पत्रकार डिगंबर महाले,ईश्वर महाजन, जितेंद्र पाटील,रविंद्र बोरसे,महेंद्र पाटील यांच्या सह अमळनेर युवा मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस निरीक्षक श्री अंबादास मोरे यांना अमळनेर हेडलाइन्स परिवारातर्फे वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
--------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.