सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानी दीदींचे अमळनेर येथे व्याख्यान _‘खुशनुमा जीवन जीने की कला’ या विषयावर साधणार संवाद_

अमळनेर -
आपल्या मधूर आणि प्रेरक वाणीने जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन करुन अनेकांना सकारात्मक जीवन जगण्याची दिशा देणा-या जगप्रसिद्ध प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे अमळनेर येथे दि.७ मार्च रोजी  ‘खुशनूमा जीवन जीने की कला’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाबाबत अमळनेर येथील ब्रह्माकुमारीज् सेवा केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत ब्रह्माकुमारीज् माध्यम प्रतिनिधी डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.
प्रेरक व्यक्तित्व शिवानी दीदी
    प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जनसामान्यांना जीवन जगतांना येणा-या अडचणी, छोट्या छोट्या गोष्टीतून नकारात्मकता कशी वाढीस लागते व त्यावर काय उपाय योजना करता येईल अशा जनसामान्यांच्या प्रश्नांना प्रभावशाली व अनुभवयुक्त मार्गदर्शन केले आहे.
दीदींच्या सहज व चटकन आत्मसात करता येणा-या उपायांनी अनेकांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदललेली आहे. शिवानी दीदी यांना नुकताच भारताच्या राष्ट्रपती महोदयांनी नारीशक्ति या पुरस्काराने सन्मानीत केले आहे. अशा प्रेरक व्यक्तिमत्वाच्या व्याख्यानाचा लाभ अमळनेर आणि परिसरातील नागरिकांना  मिळणार आहे. 
अमळनेर येथे ऐतिहासिक व्याख्यान :
      ब्रह्माकुमारीज् अमळनेर आयोजित विश्वविख्यात मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानी दीदींचे प्रेरणादायी व्याख्यान स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ग्राऊंड, गळवाडे रोड येथे दि. ७ मार्च २०२० रोजी संध्याकाळी ५ ते  ७ यादरम्यान ‘खुशनुमा जीवन जीने की कला’ या विषयावर आयोजित केले आहे. जास्तीत जास्त  नागरिकांना दीदींच्या कार्यक्रमाचा लाभ मिळावा यासाठी ब्रह्माकुमारीज् परिवारातील सर्व सदस्य कामाला लागले आहेत. विविध समित्यांचे गठण याप्रसंगी करण्यात आलेले असून शहरात विविध ठिकाणी  बॅनर, होर्डिंग लावण्यात आलेले आहेत आणि हॅडबीलचे वितरणही करण्यात येत आहे.  
उपस्थितीचे आवाहन :
ब्रह्माकुमारीज् अमळनेर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी विद्यादीदींनी याप्रसंगी सांगितले की, ब्रह्माकुमारीज् जळगावच्या उपक्षेत्रिय निर्देशिका मिनाक्षी दीदींच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शिवानी दीदींचे व्याख्यान होत असून हे आम्हा शहरवासीयांचे भाग्य आहे. दीदींचे व्याख्यानास सर्वांना विनामूल्य व खुला प्रवेश असून दिदींच्या व्याख्यानाची लोकप्रियता लक्षात घेता आसन व्यवस्थेच्या निश्चितीसाठी ब्रह्माकुमारीज्  सेवाकेंद्रात अथवा ब्रह्माकुमारीज प्रतिनिधींशी संपर्क साधावा असे आवाहन अमळनेर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी विद्या दीदी यांनी केले आहे.
---------------------------------------------------------------------------------
   ओम टी पान मसाला च्या नविन दालन


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.