मारवड पोलीसांचा गावठी दारू अड्ड्यावर छापा साडेआठ हजाराचे साहित्य जप्त,आरोपीस अटक

अमळनेर -
तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन हद्दीत उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक  राहुल फुला यांनी पथकासह  निंभोरा या गावी बाबुलाल महादु कोळी याचे चिखलीनाला येथील गावठी हातभट्टीवर पोलीस पथकासह छापा मारला. सदर ठिकाणी रु.८६००/- रु.किंमतीची जिवंत हातभट्टी, कच्चे रसायन, तयार दारु, दारु साठी लागणारा गुळ पत्र्याचे व प्लास्टिक ड्रम असे साहित्य मिळुन आले आहे. सदर इसमावर प्रोगुरनं.८/२०२० महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(फ)(ख)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सदर पथकात सपोनि राहुल फुला, सहाय्यक     फौजदार संतोष पवार,पोलीस नाईक सचिन निकम,भास्कर चव्हाण, तेली आदी कर्मचारी  होते.
-------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.