अमळनेरात गोळीबार करून व्यापाराला लुटण्याचा प्रयत्न, दोन्ही चोरटे दुचाकीने झाले फरार न्यू प्लॉट भागातील नर्मदा वाडीजवळ सोमवारी रात्री पावणे अकरा वाजेचा थरार, सिंधी व्यापारींचा निषेर्धात दुकाने बंदचे आवाहन

अमळनेर-
हरात एका व्यापाऱ्यावर गोळीबार करून दोघांनी हातातील पिशवी लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ रोजी रात्री पावणे अकरा वाजता न्यू प्लॉट भागातील नर्मदा वाडीजवळ घडली. दोन्ही चोरटे दुचाकीने फरार झाले. यामुळे पोलीस आणि व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे.

सिंधी व्यापारींचा निषेर्धात दुकाने बंदचे आवाहन
व्यापाऱ्यावर हल्ला झाल्याचे वृत्त शहरात पसरताच सिंधी व्यापारींचा निषेर्धात दुकाने बंद करण्यात येणार आहे.चोरट्यांचा त्वरित तपास करून त्यांना गजाआड करण्याची मागणी करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक  शंकर बितराई यांचे भाऊ  बसंतालाल बितराई कैलास ट्रेडिंगचे मालक हे  त्यांचा मुलगा अजय याच्या सोबत दुकान बंद करून घरी परतले असताना  ते घराजवळ पोहचले असता सेंट्रल बँकेकडून दोन जण मोटरसायकलवर आले त्यांनी दोघांच्या हातातून खाली थैली व जेवणाचा डबा होता तो  हिसकवण्याचा प्रयत्न करीत असताना गोळी बार केला. सुदैवाने गोळी दोघांच्या मध्ये जाऊन भिंतीला लागली आणि रिकामी पुगली  अवघ्या २० फुटाच्या रस्त्यावर जाऊन पडली. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र ससाणे ,साहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर व शरद पाटील,रवी पाटील,हितेश चिंचोरे हे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा केला व परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी केली.  चार वर्षांपूर्वीही याच ठिकाणी या व्यापाºयाला लुटण्याचा प्रयत्न झाला होता. अश्या घटना वारंवार घडत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

---------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.