कु. पल्लवी देशपांडेचे बडोदा विद्यापीठात उत्तुंग यश पदवीप्रदान समारंभात मिळाली तीन सुवर्णपदके

अमळनेर -
येथील रहिवासी व सध्या दिल्ली येथे परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असलेल्या 
कु.पल्लवी श्रीपाद देशपांडे यांनी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या दीक्षांत समारोहात ३ सुवर्ण पदक प्राप्त केले. तिला ही सुवर्ण पदके बडोद्याच्या राजमाता श्रीमती शुभंगिनी राजे गायकवाड व कुलगुरू डॉ. परिमल व्यास यांचे हस्ते प्रदान करण्यात आली आहेत.
     कु.पल्लवी हिने राज्यशास्त्र विषयात एम.ए.पदवी संपादन करून विद्यापीठातर्फे एक, विभागातर्फे दुसरे व विषयात प्रथम असे तिसरेही सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत.या विषयात तिला गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती देखील प्राप्त झाली होती. याआधी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बी.ए. राज्यशास्त्र विषयात प्रथम क्रमांकाने यश संपादन केले होते. तसेच तिने अभ्यास केलेल्या भारत सरकारच्या Bulk LPG Policy या पुस्तकाचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री ना. धर्मेंद्रजी प्रधान यांच्या हस्ते भुवनेश्वर येथे प्रकाशन झाले होते.
    सध्या कु.पल्लवी ही दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयात ना. व्ही. मुरलीधरन (परराष्ट्र व संसदीय कामकाज राज्यमंत्री, भारत सरकार) यांचे कडे Research & Social Media Associate या पदावर कार्यरत आहे. कु. पल्लवी ही उदय मल्टीसर्व्हीसेसचे श्री उदय देशपांडे व लोकमान्य विद्यालयातील शिक्षिका सौ. सायली देशपांडे यांची सुकन्या आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.