तहसिल विभागाच्या भरारी पथकावर वाळू माफीयांचा भीषण हल्ला माफीयाच्या हल्ल्यात तहसिल कर्मचारी जखमी


अमळनेर  -
तालुक्याच्या पश्चिम भागातील पांझरा नदी पात्रातून चालणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी वाहतूक  करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडायला गेलेल्या पथकावर बेटावद येथील वाळू चोरांनी लोखंडी रॉड,पावडीच्या दांड्याने व दगडांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना भरवस गावाजवळ रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली.जखमींना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
          अमळनेरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांनी नेमलेल्या पथकातील तलाठी प्रथमेश पिंगळे,हर्षवर्धन मोरे,धीरज देशमुख,आशिष पारधी,पुरुषोत्तम पाटील,स्वप्नील कुलकर्णी,पिंटू चव्हाण,जे.ए.जोगी यांना कळंबू येथून भरवस गावाकडे अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच भरवस गावाकडे गेले असता गावापुढे रेल्वे पुलाच्या अलीकडे त्याना बेटावद येथील बबलू राजेंद्र तायडे  व त्याच्या सोबत ७ ते ८ जण ट्रॅक्टरवर वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पथकाने त्यांना पकडण्याचे प्रयत्न करताच बबलू तायडे याच्यासह इतरांनी धीरज देशमुख यांच्या डोक्यावर पावडीच्या दांड्याने हल्ला केला. तसेच हर्षवर्धन मोरे व आशिष पारधी यांच्यावर देखील लोखंडी रॉडने पायांवर हल्ला केला आणि इतरांनी दगडांनी हल्ला केला. तलाठ्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि पथकातील मागे असलेल्या तलाठ्यांना कळवले. त्या गडबडीत पी.एस. पाटील यांची मोटरसायकल घसरून पडली त्यांच्या डोक्याला मार लागला व डोक्याला ८ टाके पडले आहेत. हल्लेखोर धीरज देशमुख यांच्या मोटरसायकलची चावी घेऊन पळून गेले अशी आपबीती तलाठ्यांनी कथन केली.घटनेची माहिती कळताच प्रांताधिकारी सीमा आहिरे,तहसिलदार मिलिंद वाघ यांनी भेट दिली.जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरू होती.या घटनेमुळे वाळू माफीया किती बेधडकपणे वाहतूक करत आहेत हे स्पष्ट झाले आहे.
--------------------------------------------------------------------------------ओम टी पान मसाला च्या नविन दालन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.