महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे अमळनेर येथे पत्रकारांनाा हेल्मेट वाटप रस्ता सुरक्षा मोहीम अंतर्गत हेल्मेट वाटप-अभिनव योजना

अमळनेर - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे ,प्रदेश संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,प्रदेश प्रसिद्धिप्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ रोजी अमळनेर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिका-यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा,विभागीय सहसचिव संभाजी देवरे,विभागीय उपाध्यक्ष शैलेश पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या उपस्थितीत संघटनेच्या  पदाधिका-यांना हेल्मेट,
ओळखपत्र,पेन व संघटनेची दिनदर्शिका वाटप करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रा.हिरालाल पाटील, तालुका कोषाध्यक्ष सुरेश कांबळे,जगन्नाथ बडगुजर,शरद पाटील,प्रसाद जोशी,प्रकाश जैन,कुणालठाकूर ,शशिकांत पाटील,गजानन पाटील आदी पत्रकार हजर होते. यावेळी संभाजी देवरे,शैलेश पाटील,वसंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हिरालाल पाटील, तर तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी आभार मानले.
              महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यांनी राज्यात सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान मोहीम अंतर्गत  प्रत्येक जिल्ह्यात मोफत हेल्मेट वाटप मोहीम राबविण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील संघटनेचे पत्रकारांना ओळखपत्र,हेल्मेट ,दिनदर्शिका ,व पेन वाटप करण्यात आल्याने यावेळी सर्व पत्रकार बांधवानी समाधान व्यक्त केले.
----------------------------------------------------------------------------ओम टी पान मसाला च्या नविन दालन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.