अमळनेर - आर.टी.ओ.कार्यालयात उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल कु.निलम किशोरकुमार सैनानीचा येथील जय झुलेलाल सेवा समितीच्या वतीने श्री गुरूनानक नगर सिंधी कॉलनी येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पं.संजय गोपीचंद शर्मा,शहर पंचायतीचे अध्यक्ष- श्यामलाल लुल्ला,शहर पंचायतीचे उपाध्यक्ष-लालचंद सैनानी,सुंदरदास वछानी,हिरानंद पंजाबी, झामनदास सैनानी, गुरूनामल बठेजा,पप्पूशेठ सैनानी,रमेश जीवनानी ,सुरेश कुंदनानी,शंकर बितराई, प्रेम सैनानी,हसमुख सैनानी, शंकर बितराई, लखन बजाज, वासुदेव आहुजा, हरेश आहुजा, शुगानी सर, दौलतराम सैनानी, मुलचंद सैनानी,भरत धिगराई,सत्यपाल निरंकारी, रोहित बठेजा, झामन तोलानी,नरेश तोलानी,सोनु डिंगरे,प्रकाश हिंदुजा,सुरेश मकडीया,पहलाज रोचलानी,अनिल रोचलानी,राहुल मल्कानी,रितिक कोडवानी,गौरव बजाज,अनिल सैनानी,मयुर मल्कानी,हितेश शर्मा,जितेश जग्यानी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कु.निलम व तिच्या परिवारातील आई,वडील,नानी, यांचा अजय हिंदुजा व महाराज संजय शर्मा,सौ.सीमा सासनांनी, दिव्या पंजवानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कु.निलम व तिच्या परिवारातील आई,वडील,नानी, यांचा अजय हिंदुजा व महाराज संजय शर्मा,सौ.सीमा सासनांनी, दिव्या पंजवानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निलमने कुटुंबाच्या अत्यंत सामान्य परिस्थितीत हे यश मिळवले आहे. 
किराणा दुकानात अकौंटंटचे काम करणारे वडील व घरीच शिवणकाम करणारी आई या दोघांच्या परिश्रमांतून यशाची प्रेरणा मिळाली असे निलमने यावेळी बोलताना सांगितले. मुलींना शिक्षण द्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी सरकारी नोकरीत अनेक संधी उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करावा.आपल्या परिवाराचे,समाजाचे संस्कार टिकवण्याची जबाबदारी तरूणांची आहे असे मत निलम सैनानी हिने व्यक्त केले.

सिंधी समाजातील लाडली सर्वसाधारण परिवारातील मुलीने परिश्रम, स्वकर्तृत्वातून शासकीय अधिकारी पदाचा टप्पा गाठला याबद्दल समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला.
बेटी बचाओ-बेटी पढाओ प्रमाणेच बेटी पढाओ याकडेही सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे अशीही चर्चा या निमित्ताने झाली.या कार्यक्रमात समाजातील मान्यवरांनीही निलम सैनानीचा सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी झुलेलाल समिती सदस्य-प्रकाश जग्यानी, नरेश पंजवाणी, हरेश शामनानी, संजय बितराई,भरत पंजाबी, भरत कालानी,घनश्याम बालचंदानी,घनश्याम थदानी, संजय शर्मा,
कैलास थाराणी,अनिल सैनानी,मुन्ना सैनानी, मुकेश थाराणी आदींनी परिश्रम घेतले. 

भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन झुलेलाल मंदिराच्या परिसरात करण्यात आले होते. सिंधी कॉलनीतील सर्व समाज बांधव व भगिनी यावेळी उपस्थित होते.

भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन झुलेलाल मंदिराच्या परिसरात करण्यात आले होते. सिंधी कॉलनीतील सर्व समाज बांधव व भगिनी यावेळी उपस्थित होते.
No comments
Post a Comment