-------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
----------------------------------------------------------------------
जळगाव - ‘कोरोना’ या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वितकरण्यात आला आहे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे. या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 0257-2223180/2217183 असा आहे. नागरिकांनी आपापल्या घरीच थांबावे. शासन वेळोवेळी देत असलेल्या सुचनांचे पालन करावे व ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
No comments
Post a Comment