---------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
अमळनेर - सध्या जागतिक स्तरावर कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाने आपत्ती घोषित करण्यात आली आहे .या भयावह परिस्थितीत राजकीय, सामाजिक तथा चित्रपट क्षेत्रातील महानुभव जनजागृती करीत आहेत.तसेच अमळनेर विधानसभा क्षेत्रात सातत्याने आपली अभिनव कल्पना राबवणारे आणि सामाजिक भान ठेवणारे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी यापूर्वीच आपत्तीच्या काळात जनजागृतीच्या उद्देशाने परिसरातील जनसामान्यांना प्रबोधनात्मक आवाहन करीत जनजागृतीचा वसा कायम ठेवला आहे.माजी आमदारांनी स्वखर्चाने "व-हाडी सावधान" या शीर्षकाचे मनोगत वजा निवेदनाच्या हजारो प्रती छापून वितरित करत आहेत. या विनम्र आवाहनातून त्यांनी सांगितले आहे की
*"तुमची माझी जुनीच ओळख*
*तुमचे माझे जुनेच नाते.....*
*तुम्हीच मज म्हणता आपले*
*तुम्हीच आहात माझे चाहते!"*
असा भावपूर्ण आपुलकीचा संदेश दिला आहे. सभोवतालच्या सर्वांना आपले मानणाऱ्या साहेबराव दादांनी सामाजिक परिवर्तनाबाबत सजगतेचा आणि जनजागृतीचा संदेश देतांना आपल्या निवेदनात म्हटले आहे की,आपण लग्नसोहळ्यात हजारो रुपयांची उधळपट्टी करतो.विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी धावपळ करत येणा-या व-हाडी मंडळीच्या अपघाताला निमंत्रण देतो.
हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे, तरी आपण त्याचे साक्षीदार होतो असे सामाजिक वास्तव त्यांनी मांडलेले आहे. यावर स्वतः केलेला उपाय म्हणजे त्यांनी त्यांचा मुलगा धीरेन्द्रचे फक्त ७० नातेवाईकांसमक्ष पार पाडलेला लग्न सोहळा.मी असा विवाह समारंभ पार पाडू शकतो ,तर आपण का नाही ?असा वधू-वरांना त्यांनी प्रश्न विचारला आहे.

हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे, तरी आपण त्याचे साक्षीदार होतो असे सामाजिक वास्तव त्यांनी मांडलेले आहे. यावर स्वतः केलेला उपाय म्हणजे त्यांनी त्यांचा मुलगा धीरेन्द्रचे फक्त ७० नातेवाईकांसमक्ष पार पाडलेला लग्न सोहळा.मी असा विवाह समारंभ पार पाडू शकतो ,तर आपण का नाही ?असा वधू-वरांना त्यांनी प्रश्न विचारला आहे.
सध्या कोरोनो नावाच्या विषाणूने संपूर्ण देश संकटात सापडला आहे. आपल्या देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे भारतीयांचे नैतिक कर्तव्य आहे. आताही हीच वेळ आहे.लग्न समारंभातील गर्दी कमी करून कुटूंबातील मोजक्या व आवश्यक नातेवाईकांना निमंत्रणे देऊन कमी खर्चात लग्न सोहळा पार पाडण्याचे आवाहन माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.त्यांच्या या पत्रकाची सर्वत्र चर्चा होत आहे.
No comments
Post a Comment