शिवसेना शहर प्रमुखपदी संजय पाटील



अमळनेर - 
शिवसेनेच्या अमळनेर शहर प्रमुखपदी माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संजय पाटील हे विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. त्यांनी पैलाड भाग सदैव शिवसेनेचा बालेकिल्ला राखण्यात महत्वाची भुमिका बजावली आहे. यापूर्वी देखील त्यांनी शिवसेना शहरप्रमुख ही जबाबदारी सांभाळली असून पक्षाने पुन्हा त्यांना ही महत्वपूर्ण जबाबदारी दिल्याने त्यांचे शिवसेना उपनेते व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील , आ.चिमणराव पाटील,आ.किशोर पाटील,जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यासह पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे .
--------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.