प्रताप महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन

Wednesday, March 11, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर - येथील खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय ( स्वायत्त ) मधील राज्यशास्त्र विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रा.डॉ.जयदेव डोळे यांचे ' राजकीय पत्रकारिता : एक रोजगार शक्यता ' या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. प्राचार्य डॉ.ज्योती राणे अध्यक्षा असतील .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक योगेश मुंदडे ,नीरज अग्रवाल ,जितेंद्र जैन ,चिटणीस डॉ. ए. बी.जैन ,ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले व उमेश काटे, सी. सी. एम. सी. विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.एस. ओ.माळी असतील. हा कार्यक्रम दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयातील पूज्य साने गुरुजी सभागृहात होणार आहे. 
---------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines