अमळनेर - अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांची महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा मुख्य प्रतोदपदी निवड झाली आहे. या आधीचे मुख्य प्रतोद आ.अॅड अशोक पवार यांनी पदाचा
राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर अनिल भाईदास पाटील यांची मुख्य प्रतोद,(कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा) विधानसभा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर रिक्त होणाऱ्या प्रतोद या पदावर आ.यशवंत विठ्ठल माने यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी आमदार अनिल पाटील यांच्यावर विश्वास टाकला आहे. या निवडीबद्दल आ.अनिल पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
No comments
Post a Comment