राजकिय पत्रकारिता रोजगाराचे साधन होऊ शकते - प्रा.डॉ. जयदेव डोळे प्रताप महाविद्यालयात व्याख्यान संपन्न

Saturday, March 14, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर - येथील खा.शि.मंडळाच्या प्रताप महाविद्यालय येथे राज्यशास्त्र विभाग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या वतीने नुकतेच  पुज्य साने गुरूजी सभागृहात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी मंचावर खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदिप अग्रवाल,संचालक योगेश मुंदडे,समारंभाचे अध्यक्ष प्राचार्या डॉ ज्योती राणे, प्रमुख मार्गदर्शक डॉ जयदेव डोळे(औरंगाबाद),उप प्राचार्य डॉ एस.ओ.माळी,डॉ.डी.एन.वाघ,पत्रकार उमेश काटे,गटशिक्षण अधिकारी अशोक बि-हाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस दानशुर प्रताप शेटजी,पुज्य साने गुरुजी,सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पुजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी पीएच.डी पदवी संपादन केल्याबद्दल प्रा.एस.ओ.माळी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शकाचा परिचय प्रा. डॉ. विजय तुंटे यांनी करून दिला.
काय म्हणाले डॉ. डोळे
      राजकीय पत्रकारिता आज खुप महत्वाचे क्षेत्र आहे.ही एक बौद्धिक प्रक्रिया असुन एक धुंदी सुद्धा आहे.हा व्यवसाय जाहिराती शिवाय चालत नाही,वास्तव माध्यमाद्वारेच पुढे येते.हा व्यवसाय मेंदु ,माहितीचे काम करतो.राजकिय पत्रकारितेत राजकिय भाषण,राजकिय संज्ञापन,जन संपर्क या क्षेत्रात रोजगार प्राप्त करता येते.या क्षेत्रात येऊ पाहणा-यानी भाषा,तंत्रज्ञान,धीटपणा अंगीकृत करणे आवश्यक आहे.

             पत्रकार हे लोकशाहीेचे प्रतिनिधी असतात अशी विस्तृत चर्चा यावेळी झाली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे प्रा.डोळे सरानी दिली.या प्रसंगी सभागृहात विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.तसेच प्रा.अशोक पवार,प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव, ग्रंथपाल दिपक पाटील,प्रा.डॉ.विजय मांटे,प्रा.नितिन  पाटील,प्रा.माधव भुसनर,डॉ. रमेश माने,प्रा.ज्ञानेश्वर कांबले,प्रा. विलास गावित,प्रा.योगेश पाटील, प्रा.रविन्द्र मराठे,प्रा.बालाजी कांबळे,प्रा.छोटु मावची,प्रा.अर्जुन पावरा,प्रा. खलाने,प्रा.आर.एस.
माळी,प्रा.अविनाश पाटील,पत्रकार समाधान मैराळे व सुरेश कांबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप प्रा.डॉ.एस. ओ.माळी यांच्या भाषणाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस. 
बी.नेरकर आणि आभार प्रदर्शन प्रा.राजपुत यांनी केले.
---------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines