एसटीच्या वाहक-चालकांना मास्क व ग्लोव्हज् द्या- मागणी

Saturday, March 14, 2020

/ by Amalner Headlines
- * जाहीरात * -

------------------------------------------------------------------------
अमळनेर -
देशात सर्वत्र कोरोना व्हायरसबद्दल संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजारास प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत.एस.टी.महामंडळाच्या चालक व वाहकांचा प्रवाश्यांशी सरळ संपर्क येत असल्याने त्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क व हॅड ग्लोव्हज् तातडीने उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी योग प्रचारक कमलेश कुलकर्णी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन कमलेश कुलकर्णी यांनी एस.टी.चे डेपो मॅनेजर यांना दिले आहे.श्री.आर.एस.पाटील यांनी सदर निवेदन स्विकारले व वरिष्ठांना तात्काळ माहिती देण्यात येईल असे सांगितले. निवेदन देण्यासाठी जयेश पाटील, अविनाश पाटील,विकास पाटील,जितेंद्र पाटील,जतिन गोहिल,अनिकेत भामरे,भुषण बिईरे,ॠषीकेश पाटील,विकास पाटील,अविनाश राजपूत आदींची उपस्थिती होती.
-----------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines