-------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
आता आपल्या एक फोनवर उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील.
अमळनेर शहरात कुलर विक्री घरपोच सेवा उपलब्ध आहे.
--------------------------------------------------------------------------
अमळनेर - देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आणि अन्य विविध आजारांचे, शस्त्रक्रीयाच्या रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासत आहे. त्यामुळे ऐनवेळी अमळनेर शहरात कोणत्याही रुग्णासाठी रक्ताची उणीव,तुटवडा भासू नये म्हणून भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जैन संघटनेतर्फे रक्त दात्यांची यादी तयार करण्यात येत आहे. ही यादी तयार झाल्या नंतर रक्तपेढीत रक्तदान करण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांसह अमळनेर शहरासह तालुक्यातील इच्छुक रक्तदात्यांनी भाजपा व जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून यादीत नाव नोंदणी करावी असे आवाहन आमदार स्मिताताई वाघ यांनी केले आहे. बहुतांश उन्हाळ्यात रक्ताचा पुरवठा कमी होत असतो. त्यात कोरोनाचा प्रसार सुरू झालाआहे.
तसेच विविध आजाराचे आणि शस्त्रक्रियाच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्त पुरवावे लागते. त्यामुळेच रक्ताची मागणी वाढू शकते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.त्यामुळे आपल्या रक्तदानाने
कोणाचा तरी जीव वाचू शकतो. म्हणून कोणत्याही दानापेक्षा रक्तदान हे श्रेष्ठदान आहे म्हणून आमदार स्मिताताई वाघ आणि भारतीय जैन संघटनेतर्फे रक्तदात्यांची यादी तयार करण्यात येत आहे. रक्तदात्यांनी यादीत नाव नोंदणी केल्यानंतर सोशल डिस्टन्सींगचे पालन करून रक्तपेढीत आठ ते दहा रक्तदात्यांच्या गृपने रक्तदान करण्यात येणार आहे. यामुळे रक्तदान करणे सोयीचे आणि सुरक्षेचे ठरणार आहे. म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांसह अमळनेर शहर व तालुक्यातील इच्छुक रक्तदात्यांनी आपली नावे नोंदणीसाठी पुढे यावे. या सामाजिक उपक्रमामुळे अमळनेर शहरातील आणि तालुक्यातील कोणत्याही गरजू रुग्णाला रक्ताची कमतरता पडणार नाही असा विश्वास आमदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला आहे.
रक्तदानासाठी साधा संपर्क
भाजपाचे शहराध्यक्ष उमेश वाल्हे (मोबा.९४०३७१९९६६),
सरचिटणीस राकेश पाटील
(८८०५५५५३५५),
विजय राजपूत(७९७२३३०४९०)
राहुल चौधरी (८४८४००६१४८)
अभिषेक पाटील (९६०४७४०१८६) आणि
भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष कमल आसकरण कोचर (९८२३७७८८५८) सचिव सतीश सौभागमल पारख (९४०३२४४७९९), स्वागत मेडिकलचे सचिन सुभाषचंद्र ओस्वाल ( ९४२००३३१४४), अरिहंत मेडिकलचे राजेंद्र बुदमुथा (९४०४८५५५६१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार स्मिताताई वाघ आणि जैन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------
आता आपल्या एक फोनवर उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील.



