"कोरोना"ला आम्ही हरवू । साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सतिष देशमुख यांनी कवितेतून व्यक्त केली भुमिका

------------------------------------------------------------------------- 
              - * जाहीरात * -
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील. 
अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------------------
                " युध्द कोरोनाशी "
   जिंकू किंवा मरू ..... 
कोरोनाला आम्ही हरवू 
हानी होवो कितीही भयंकर , आठवडे- महिने चालो संगर 
शासन आदेशाचे पालन करू ...
जिंकू किंवा मरू .. कोरोनाला आम्ही हरवू   || १ II

वैद्यकीय सेवा आमच्या पाठीशी , पोलिस जवान आमच्या पाठीशी , स्वच्छता दूत आमच्या पाठीशी , प्रिंट आणि मिडिया आमच्या पाठीशी
  दोन हात कोरोनाशी करू ... 
जिंकू किंवा मरु .. 
कोरोनाला आम्ही हरवू II २ | |

लढतील बालक , लढतील स्त्रिया 
लढतील तरुण , लढतील वृध्द 
  धैर्याने कोरोनाशी लढू ...
जिंकू किंवा मरू ... 
कोरोनाला आम्ही हरवू ॥ ३ ॥

आले गेले रोग भयंकर ,
 इलाज केले त्यावर सुंदर 
कोरोनावरही इलाज आमुचे सुरु ..
जिंकू किंवा मरू ... 
कोरोनाला आम्ही हरवू ॥ ४॥

हवी आम्हाला सर्वांची साथ , कुणीही करु नका आमुचा घात, लढेल सारी मानवजात , कोरोनावर करु आम्ही मात .. 
कोरोनाचा समूळ नायनाट करु ..
जिंकू किंवा मरु ... 
कोरोनाला आम्ही हरवू ... ॥५॥ 

देश आमुचा शिवरायांचा , झाशी वाल्या रण राणीचा, स्वाभिमानी आणि ऐक्य भावनेचा , समतेचा आणि मानवतेचा ..... 
       अंती विजयी ठरू ..... 
जिंकू किंवा मरू ... 
कोरोनाला आम्ही हरवू ॥६॥

 " जय हिंद ... जय मानवता "

            *- एस डी देशमुख,*
                     मुख्याध्यापक,
             साने गुरुजी नुतन माध्य. 
        विद्यालय,अमळनेर ,जि जळगांव
------------------------------------------------------------------------
आता आपल्या एक फोनवर  उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील. 
अमळनेर शहरात कुलर विक्री  घरपोच सेवा उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.