विहिरीत पडल्याने लोण सिम शिवारात महिलेचा मृत्यू
0
March 14, 2020
अमळनेर - तालुक्यातील लोण सिम या गावातील शिवारात विहिरीवर पिण्याचे पाणी घेण्यासाठी गेली असता रेशमा आभा धनगर (वय-४०),रा. चिंचवे ता.जि.धुळे ही महिला पाय घसरुन पडल्याने मयत झाल्याची घटना आज घडली. याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी दिली असता मारवड पोलीस स्टेशनचे स.पो.नि. राहुल फुला यांनी घटनास्थळीभेट दिली. मयत महिलेचा भाऊ बाबु सहादु व्हडगर याच्या कडून घटनेबाबत माहिती घेतली.मयत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास राहुल फुला यांचे मार्गदर्शनाखाली विशाल चव्हाण,प्रकाश साळुंखे, दिनेश कुलकर्णी हे करीत आहेत.





