येथील श्रीराम कॉलनी परिसरात श्री संत सखाराम महाराज यांच्या शेतात सालाबाद प्रमाणे होळी करण्यात आली.
होळीच्या निमित्ताने वर्षभरातून एकदाच सर्व आबालवृद्ध ठाकूर समाज बांधव एकत्रित येतात.
अशी साजरी केली होळी

ठाकूरांच्या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे उंबर झाडाचा दांडा उभा करून ठाकूर बांधव होळी साजरी करतात.त्याच्या पायाशी गोवऱ्या ठेवून होळीसाठी कोरडी लाकडं लावली जातात.लाकडं, गोवऱ्या व होळीचे पूजा,सजावट साहित्य सामूहिक वर्गणीतून गोळा करण्यात आले.होळी रंगबिरंगी पताका,फुगे लावून महिला आणि पुरुषांनी सजविली.तर जमातीचे स्थानिक प्रमुख दिलीप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,प्रकाश वाघ,मिनाबाई वानखेडे,अपेक्षा पवार,गुणवंत वाघ,प्रकाश ठाकूर,संजय ठाकूर आदिंनी होळीला पुष्पहार हार कंगन अर्पण करून पूजन केले.होळीला उपस्थित समाज बांधवांनी अग्नि देऊन होळी पेटवली.नैवेद्य होळीला देऊन ' होळी रे होळी' च्या एकच जल्लोषात होळी भोवती आंनदी वातावरणात फेर धरण्यात आला.याप्रसंगी होळीचा प्रसाद म्हणून गुळाची जिलेबी सर्वांना वाटण्यात आली.रात्री उशिरापर्यंत होळीच्या अग्नीभोवती लोक आनंदात उत्साहात असतात.
समाज बांधवांची उपस्थिती
याप्रसंगी उमेश ठाकूर,अनिल ठाकूर,देविदास ठाकूर,बेबीबाई ठाकूर,संजय सूर्यवंशी,निलेश वाघ,रविंद्र वानखेडे,धनराज ठाकूर,प्रविण ठाकूर,उमाकांत ठाकूर,सुकदेव ठाकूर,कोकिळाबाई ठाकूर,कलाबाई ठाकूर,यशवंतराव सूर्यवंशी,जयवंतराव जाधव, मनिषा ठाकूर,लक्ष्मीबाई ठाकूर,ज्ञानेश्वर ठाकूर,सुरेश ठाकूर,सौ.सरला जाधव,हेमंत वानखेडे, मंगल ठाकूर,देवका ठाकूर,सौ भारती ठाकूर,मिना ठाकूर,सतिष ठाकूर,हिम्मत
ठाकूर,विनोद ठाकूर,सचिन ठाकूर आदिंसह मोठ्या संख्येने ठाकूर समाज बांधव उत्साहात उपस्थित होते.



