जागतिक महिला दिनानिमित्त आज सुजाण पालकत्व विषयावर व्याख्यान सुप्रसिद्ध वक्ते जयदीप पाटील पालकांशी साधणार संवाद

- जाहीरात - 

---------------------------------------------------------------------------------
अमळनेर -
आजच्या धकाधकीच्या काळातील सर्वात कठीण आव्हान कोणते ? तर ते पालकत्वाचे "मुलांशी कसे वागावे...कसे बोलावे मुलांशी वागताना नेमकी कशी भुमिका घ्यावी हया सर्व प्रश्नाचे महत्व लक्षात घेवून विद्यार्थी व पालकांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खान्देशातील सुप्रसिद्ध व प्रभावी वक्ते जयदीप पाटील (जळगाव) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अमळनेर महिला मंच व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक व पालकांसाठी वर्षभराची व्याख्यानमाला सुरू करण्याचे नियोजन आहे."भुकंप घराघरात व सुजाण पालकत्व" व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफन्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिध्द वक्ता,अनेक पुरस्कारांचे मानकरी,सातत्याने मुलांमध्ये व मुलांसाठी काम करणारे श्री.जयदीप पाटिल यांची उपस्थिती लाभणार आहे.ते अतिशय प्रभावीपणे सर्वांशी संवाद साधतील. दिनांक ८ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ७ य़ा वेळेत छ्त्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास अमळनेरातील सुजाण नागरीक,पालक व शिक्षकानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अमळनेर महिला मंचच्या अध्यक्षा डॉ.अपर्णा मुठे व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन श्री.नीरज अग्रवाल यांनी केले आहे. 
-----------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.