------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
मुंबई - कोविड १९ विषाणू प्रसारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये संस्था आणि नागरिक यांना सहभागी होता येणार आहे.जे नागरिक, उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९" या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सदर देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के सूट देण्यात येते.
खात्याची सविस्तर माहिती
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300




