"कोरोना"च्या पार्श्वभूमीवर नपातर्फे शहरात स्वच्छता व फवारणी मोहीम लॉकडाऊनमध्ये अखंड विज पुरवठा - नागरिकांना दिलासा सतर्क प्रशासनास जनता देतेय धन्यवाद

---------------------------------------------------------------------------- 
               - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------
अमळनेर -
सर्वत्र सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता रहावी यासाठी नगर परिषदेचे प्रशासन सक्रीयपणे मोहीम राबवत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छतेप्रमाणेच फवारणी देखील करण्यात येत आहे. तर लॉकडाऊनमुळे घरीच असलेल्या नागरिकांनी अखंड विज पुरवठा होत असल्याबद्दल विज वितरण कंपनीचे आभार मानले आहेत.
मुख्य मार्गासह कॉलनी परिसरातही फवारणी
 
  शहरातील सर्वच भागात नगर परिषदेच्या वतीने फवारणी करण्यात आली. मा.आ.कृषीभुषण साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील,मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी शहरातील स्वच्छता व फवारणीचे उत्कृष्ठ नियोजन केले आहे. मा.आ.पाटील हे त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांसह व्यक्तीगतरित्या फवारणी मोहीमेवर लक्ष ठेवत आहेत. नपाच्या अग्निशमन दलाचे वाहन,दोन टॅंकर यांच्या माध्यमातून फवारणी करण्यात येत आहे.शहरातील मध्यवर्ती भागासह कॉलनी परिसर,सिंधी कॉलनी,शिवाजी नगर आदी भागातही स्वच्छता व फवारणी करण्यात आली आहे.

अखंड विज पुरवठा - कर्मचारी वर्गाचे धन्यवाद
      सर्व व्यवसाय बंद असल्याने नागरिक आपल्या घरीच आहेत. घरी राहून कंटाळा येऊ नये म्हणून टी.व्ही.पहाणे,संगणकावर कामे करणे यासाठी विजेची आवश्यकता असते. या काळात विज वितरण कंपनीने अखंडित विज पुरवठा केल्याने नागरिक विज कर्मचा-यांना धन्यवाद देत आहेत. ग्राहकांना अखंड व सुरळीत विज पुरवठा मिळावा यासाठी विज वितरण कंपनीचे उप अभियंता प्रशांत ठाकरे,ए.ई.वैभव देशमुख,लाईनमन जगदीश वंजारी,यांच्या मार्गदर्शनाखाली वायरमन योगेश पाटील,भागवत माने,दिपक बि-हाडे,भरत पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.विज वितरणात एखादी समस्या  निर्माण झाल्यास त्वरित सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सक्रिय कामामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. 
सर्व प्रशासकीय यंत्रणा सक्रीय
       कोरोना रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व प्रशासकीय यंत्रणा जलद गतीने कामास लागली आहे. नगर परिषद,महसुल,पोलीस,आरोग्य या विभागातील अधिकारी व कर्मचारी,पंचायत समिती,विज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कसोशीने प्रयत्न करत आहेत.नागरिकांनी सुचनांचे पालन करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.