-----------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
अमळनेर– अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागात एका व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. राकेश चव्हाण असे मयताचे नाव असून तो काही दिवसांपूर्वी पॅरोलवर बाहेर आल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अंबादास मोरे हे सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. मारहाण व वाद कशावरून झाला हे कळलेले नाही.मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमावाच्या मारहाणीत चव्हाण याच्या मृत्यू झाल्याचे समजते.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.




