---------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
अमळनेर - शहरातील हेडावे नाका भागात रोडजवळ सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता गर्दी जमा केल्याप्रकरणी सात भाजीपाला विक्रेत्यांविरूध्द अमळनेर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दि.११ रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान अमळनेर येथील पारोळा रोडजवळ असलेल्या हेडावे नाका येथे राहुल भगवान महाजन,अनिल महाजन, गुलाब भगवान महाजन,मंगेश अशोक
महाजन,गणेश वासुदेव महाजन,विशाल महाजन,संतोष रामचंद्र चौधरी हे सात जण सोशल डिस्टन्सींगचा वापर न करता गर्दी जमा करून भाजीपाला विक्री करत असल्याचे आढळून आले. या बाबत नपाचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भादंवि १८६० चे कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हे.कॉ. पुरुषोत्तम पाटील हे करीत आहेत.




