कोरोना बाबत नपाची घंटा गाड्यांद्वारे सतत जनजागृती आगळा-वेगळा प्रयोग राबवून गरजूंना मदतीचा हात

----------------------------------------------------------------------------
                    - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------------
अमळनेर - 
आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना (कोविड-१९) या विषाणूचे संसर्गजन्य रुग्ण आढळून येत आहेत. या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी अमळनेर शहर व तालुक्यात उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,पोलिस निरिक्षक,आरोग्य विभाग व नगरपरिषद आदी प्रशासनामार्फत नपाच्या  घंटा गाड्यांवर शासन निर्देशानुसार जनजागृती मोहीम सातत्याने दररोज राबविली जात असून उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे, तहसिलदार मिलींद वाघ, पोलिस निरिक्षक अंबादास मोरे,मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड, यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार गर्दी टाळण्यासाठी
नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पिंपळे रोड, शांतीनगर येथील आदीवासी वस्तीतील ६५ कुटुंब दिनांक २४ मार्च,२०२० पासून लॉक डाउन असल्यामुळे प्रायोगिक तत्वावर दैनंदिन गरजेचे अत्यावश्यक सामान - ५ क्विंटल गह, १ क्विंटल बटाटे, १ क्विंटल वांगी, १ क्विंटल कोबी, ५०किलो हिरवी मिरची, ६५ किलो तेल, ६५ किलो मीठ, ३५ किलो मिरची पावडर, २० किलो मसाला पावडर ,५ किलो हळद/ जीरे। मोहरी, १५० नग मास्क आणि विप्रो तर्फे २८० नग संतुर साबण असे एकुण रक्कम रुपये ५० हजार रूपये  किंमतीच्या मालाची समप्रमाणात वाटप करुन शिजवलेले अन्न पुरवण्या दरम्यान होत असलेली गर्दी टाळून सोशल डीस्टंन्सींगचे पालन व्हावे म्हणून स्वत:चे घरात कुटुंबासह स्वत:चे अन्न घरातच राहून तयार करणे कामी प्रोत्साहनात्मक अभिनव प्रयोग राबविण्यात आला. याप्रसंगी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,नगरसेवक विवेक पाटील, अॅड.यज्ञेश्वर पाटील, नगरसेवक घनश्याम पाटील,विक्रांत पाटील, दिपक चव्हाण,अभिषेक ढमाळ,आधार बहुद्देशिय संस्थेच्या चेअरमन भारती पाटील, जयश्री ठाकरे, अश्विनी सुर्यवंशी,वैशाली शिंगामे, कलीम खान,तौसिफ खान,किरण भिल, सुरेश भिल, नामदेव भिल आदी उपस्थित होते.
------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.