कोरोनाग्रस्तांना रक्तदानासाठी आयोजित रक्तगट तपासणी व नोंदणी शिबिरास प्रतिसाद राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे रक्तदात्यांची यादी झाली तयार

------------------------------------------------------------------------- 
              - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------------
अमळनेर-
येथील विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात साने गुरुजी शाळेत झालेल्या रक्तदान नोंदणी शिबिरास सर्व स्तरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून याठिकाणी इच्छुक रक्तदात्याची यादी तयार करण्यात आली.
      कोरोना ग्रस्तांना वाचविण्या साठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता पडणार असल्याने आरोग्य मंत्र्यांनी राज्यात रक्त दानाचे आवाहन केले होते.
त्यादृष्टीने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आ अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे नियोजन केले होते,मात्र सद्यस्थितीत रक्तपेढीत रक्तसाठा शिल्लक असल्याने तूर्त रक्तदान 
शिबिर रद्द करून रक्तगट तपासणीद्वारे रक्तदात्यांची यादी करण्याचे नियोजन करण्यात आले.जेणेकरून केव्हाही रक्तदाते उपलब्ध होऊ शकतील.त्यानुसार साने गुरुजी शाळेत इच्छुक व्यक्तींचे रक्तगट तपासणी व नोंदणी जीवनश्री ब्लड बँक व अमळनेर तालुका लॅबोरेटरी असोसिएशनच्या सहकार्याने करण्यात आले.आ.अनिल पाटील यांनीही शिबिरास भेट दिली.याप्रसंगी ब्लड बँकेचे संचालक 
संतोष पाटील,अमळनेर तालुका लॅबरोटरी असोसिएशनचे भटू   वि.पाटील,सेक्रेटरी शरद शेवाळे,सद्स्य शशांक जोशी, उदयकुमार खैरनार,सुनील पाटील,संजय मुसळे,अमोल शहा ,दत्तप्रसाद बडगुजर,महेंद्र  साळुंके ,लक्ष्मीकांत पाटील मनोज सूर्यवंशी,राहुल महाजन, किशोर सूर्यवंशी,आनंद शिंदे ,योगेश पाटील आदींनी योगदान दिले.शिबिरासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल शिंपी,निलेश देशमुख,
गोविंदा बाविस्कर,गणेश पाटील,बाळू पाटील,प्रविण पाटील,उमेश सोनार,भूषण भदाणे,मनोज बोरसे,चेतन पाटील आदींनी परिश्रम घेतले.
           सदर शिबिरास नगरसेवक राजेश पाटील,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विनोद कदम,इम्रान खाटीक,गोविंदा बाविस्कर आदींचे सहकार्य लाभले.यावेळी खाशिचे मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल,माजी नगरसेवक राजू फापोरेकर,एल.टी.पाटील,बंडू जैन आदींनी भेट दिली.
------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.