लॉकडाऊनमुळे रोजगार बंद,बांधकाम मजुरांची स्थिती बिकट मुंदडा बिल्डर्सतर्फे मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

----------------------------------------------------------------------------
                - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोना या संसर्गजन्य व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी आपल्या घरातच थांबायचे आहे. सोशल डिस्टन्सींगचेपालन करायचे आहे. या निर्देशानुसार सर्व व्यवसाय बंद आहेत. यात काम करणा-या मजुरांची परिस्थिती यामुळे बिकट झाली आहे. मुंदडा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स यात काम करणा-या मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले. 

कोरोना आजारामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस हा आमच्यासाठी खुपचं महत्वाचा होता.कारण ज्या हजारो हातांनी आपली कंपनी यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचवली आहे,त्यांना अन्नदान करतानाचा आनंद गगनात मावत नव्हता

           *-ओमप्रकाश मुंदडा*
 
   
कोरोनामुळे आज संपूर्ण देश लॉक डाउन झालेला आहे. खरं पाहता ते देशहितासाठीच आहे. पण संपूर्ण कामधंदे बंद असल्याने आज मजुरांचे फारच हाल होत आहेत.हातावरच पोट असल्याने हे दिवस जगणे त्या परिवारासाठी कठीण झाले आहेत.
           यातच एक मदतीचा हात म्हणून *प्रकाश भाऊ मुंदडा यांच्या तर्फे मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीत काम करण्याऱ्या *350 मजुरांना मुंदडा पार्क येथे 5 kg गव्हाचे पीठ, 3kg तांदूळ, 2kg डाळ , 1लिटर तेल आणि साबनेचे वाटप करण्यात आले.* यावेळी सुरक्षित अंतर राखण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली होती.याप्रसंगी श्री.प्रकाशभाऊ मुंदडा,प्रभाकर दादा देशमुख,राजू भाऊ मुंदडा, योगेशभाऊ मुंदडा,पंकजभाऊ मुंदडा,संजयजी वर्मा साहेब, अभिनय मुंदडा,अमेय मुंदडा,शुभम मुंदडा,पत्रकार किरण भाऊ पाटील,महेंद्र भाऊ पाटील,पत्रकार गौतमभाऊ बिऱ्हाडे, राकेश काळोखे, चंद्रकांत जोशी, पप्पू लोंढे, आदित्य कोठावदे,अंकित पाटील, प्रसाद कुलकर्णीकल्पेश वाघ व असंख्य मित्र परिवार,ठेकेदार व मजूर वर्ग उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.