-----------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना विषाणूचा जगभर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने यास साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषित केला आहे. भारतात महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्याप्रमाणेच जळगांव जिल्हयामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार होत आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच अमळनेर शहरात कोरोना आजाराचा संशयीत रुग्ण आढळून आलेला नसला तरी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी संदर्भिय ।४ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग यांची कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपोद्घातातील अनुक्रमांक १,२ व ३ अन्वये incident Commander म्हणुन नियुक्ती केलेली आहे.
मास्क वापरणे बंधनकारक
उपविभागीय अधिकारी श्रीमती सीमा अहिरे यांना Incident Commander या नियुक्तीद्वारे मिळालेल्या अधिकारान्वये श्रीमती सीमा अहिरे यांनी आदेश जारी केला आहे की, उपविभागातील अमळनेर व चोपड़ा तालुक्यातील सर्व नागरिकांना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. तसेच असे मास्क मानांकित प्रतीचे अथवा घरगुती पध्दतीने तयार केलेले व योग्य पध्दतीने स्वच्छ व निर्जुतूक करुन पुन्हा वापरता येण्याजोगे असावेत अथवा रुमालाने तोड झाकणे आवश्यक राहिल. कोणत्याही नागरिकांनी जर सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुध्द साथ रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८०७ चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी व संबंधीत व्यक्तीस रुपये ५००/- दंड वसुल करून तो मा. मुख्यमंत्री सहायता निधी कोबीड-१९ यासाठी जमा करणे बंधनकारक राहील.असे आदेश उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी जारी केले आहेत.




