-------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोनाने देशाभोवती आपला विळखा अधिकच घट्ट केला आहे. त्यातच संपूर्ण देश लॉकडाऊमुळे ठप्प झाला असल्याने कोरोनाशी लढण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. म्हणूनच आमदार स्मिताताई वाघ यांनी स्वतः लक्ष घालून आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि भाजपावर प्रेम करणाऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले व तात्काळ ४५ हजार रुपयांचा भरीव निधी संकलीत केला. त्यांनी हा निधी पीएम केअर फंडात जमा केला असून कोरोनाशी लढण्यासाठी अमळनेर भाजपाचेही मोठे योगदान ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व भाजपा सक्रिय सदस्य, लोकप्रतिनिधी,आजी- माजी पदाधिकारी, गट व गण प्रमुख, शक्ती केंद्र व बुथप्रमुख, प्राथमिक सदस्य, भाजपावर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यावर विश्वास असणारे नागरिकांना आर्थिक मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अमळनेर शहर भाजपाने प्रधानमंत्री फंडासाठी ४५ हजार रुपयांचा निधी गोळा करून पीएम केअर फंडाच्या खात्यात जमा केले आहेत. आमदार स्मिताताई वाघ यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केल्यानुसार अमळनेर शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शक्य असेल तेवढे पैसे दिले. आमदार स्मिताताई वाघ यांनी सर्वाना पीएम फंडात निधी गोळा करण्याचे सांगितले. जो निधी गोळा झाला आहे त्या दात्यांची नावे आमदार स्मिताताई वाघ यांच्याकडून भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय येथे देण्यात येणार आहेत.
या ठिकाणी करता येईल स्वखुशीने आर्थिक मदत
कोरोनाशी लढण्यासाठी स्वखुशीने शक्य होईल तितकी रक्कम प्रधानमंत्री फंडात जमा करण्यासाठी अकाउंट नाव- PM CARES,अकाउंट नं- 2121PM20202,IFSC Code-SBIN000691, बँक शाखेचे नाव - स्टेट बँक ऑफ इंडिया, न्यू दिल्ली,मेन ब्रँच (शाखा), UPI ID : pmcares@sbiअसा आहे. भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या खात्यात ऐच्छिक निधी जमा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.




