अमळनेर नपास जिल्हा नियोजन समितीकडून ६:८१ लाखाचे अनुदान मंजूर लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी दिली माहिती

-------------------------------------------------------------------------- 
              - *जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------------
अमळनेर -
नगरपालिकेंतर्गत विविध विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत अमळनेर नगर परिषदेस एकूण २८ कामांसाठी ६ कोटी ८१ लाखांच्या अनुदानास जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे शहरातील विविध भागात विकास कामांना वेग येणार आहे अशी माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी दिली.
        जळगाव जिल्हा नियोजन समितीतर्फे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०१९ ते २०२० साठी अमळनेर नगरपरिषदेसाठी विविध प्रभागातील नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत १४ कामांसाठी ४ कोटी ६१ लाख रुपये तर, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजने अंतर्गत ५ कामांसाठी १ कोटी २० लाख रुपये आणि नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत ९ कामांसाठी १ कोटी रुपये असे २८ कामांसाठी ६ कोटी ८१ लाख रुपयांच्या कामास जिल्हा अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
या कामांसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जिल्हाधिकारी यांचे सहकार्य लाभले.त्यामुळे त्यांचे लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाताकृषिभूषण पुष्पलता पाटील यांनी आभार मानले आहेत.
---------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.