--------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
अमळनेर- तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशनचे हद्दीतील पाडळसे येथील महिला रूग्णाचे डायलीसीसचे औषध केवळ दोन दिवसाचे शिल्लक होते.सदर महिलेचा मुलगा औषध घेण्यासाठी जाण्यास तयार होता.पण लॉकडाऊनमुळे जाणे शक्य होत नव्हते.यावेळी मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यकपोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी त्यास घरपोच औषध मागवून दिले.
यामुळे औषध घेण्यासाठी जाण्याचे कष्ट वाचले व वेळेत औषध उपलब्ध झाले. श्री राहुल फुला यांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबतची माहिती अशी, पाडळसे येथील सचिन पाटील यांच्या आईचे डायलीसीसचे औषधं फक्त दोन दिवसांकरीताच उरल्याने व ते औरंगाबाद व पुणे येथेच मिळतअसल्याने त्यांना काही सुचत नव्हते. ते लाॅक डाऊन तोडुन परस्पर जाण्याच्या विचारात असतांनाच पाडळसे येथील पत्रकार श्री वसंतराव पाटील यांनी त्यांना सपोनि राहुल फुला यांच्याकडे पास मिळू शकेल का? यासाठी पाठविले. तेव्हा मेडीसीन ही अत्यावश्यक सेवा असून घरपोच सेवा देण्यावर भर आहे. पासची काही आवश्यकता नाही असे सांगुन लागलीच स्वत: औरंगाबाद येथील एजन्सी चालकास स्वत:चे मोबाईलवरुन फोन केला व यापुर्वी औरंगाबाद येथे पोलीस उपनिरीक्षक असतांना सन २०१० ते २०१४ पावेतो औरंगाबाद सिटी चौक पोलीस स्टेशन येथे नोकरी केली असल्याने तेथील आपल्या जुन्या व प्रतिष्ठीत मित्र परिवाराची ओळख दिली. एजन्सी चालकास त्यांचेकडुन खाजगी वाहनाची मदत घेण्यास व प्रवासामधे रस्त्यात कोणी काही अडचण केल्यास आम्हास संपर्क करण्यास सांगुन विश्वास दिला आणि सदर औषधे मारवड पो.स्टे. ला किंवा सचिन पाटील यांच्या घरी घरपोच औषधे पाठविण्याकरीता पाठपुरावा केला.सदर औषधे दि.५ एप्रिल रोजी खाजगी वाहनाने प्राप्त झाल्याने सचिन पाटील यांच्या घरी जावुन दिली असता त्यांचे आईसह संपुर्ण परिवार खुपच भारावुन गेला व त्या सर्वांनी सपोनि राहुल फुला व पत्रकार वसंतराव पाटील यांच्या प्रति आभार व्यक्त केले.




