वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करून भुकेल्यांना अन्नदानासाठी दिली ५१ हजारांची मदत माजी आ.शिरीष चौधरी यांचा स्तुत्य निर्णय

----------------------------------------------------------------------------
                  - * जाहीरात * -
अमळनेर -
देशांत कोरोनाचे संकट त्यांत झालेल्या लॉकडॉऊनमुळे गरीब कष्टकऱ्यांपुढे निर्माण झालेला उपजीविकेचा प्रश्न आदी समस्या डोळ्यासमोर ठेऊन माजी आ.शिरीष चौधरींनी उद्या ४ एप्रिल रोजी येणारा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेऊन भुकेल्यांना अन्नदान करण्याच्या कार्यात आपल्या वतीने ५१ हजारांची भरीव अशी मदत दिली आहे.
            अमळनेर मतदारसंघात अनेकांचा रोजगार बुडाल्याने त्यांना दोन वेळेचे जेवण मिळणे कठीण झाले आहे.यासाठी अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्ते मदतीचा हात देत आहेत.त्याच अनुषंगाने अमळनेर परिसरात सदैव जनहितार्थ कार्य करणाऱ्या गौक्षेत्र प्रतिष्ठान,अमळनेर यांनी गोरगरीब व गरजूना अन्नदानाचे मोठे नियोजन केले आहे.
हा स्तुत्य उपक्रम माजी आ. शिरिष चौधरी यांनाही रुचल्याने त्यांनी आपल्या  वाढदिवसाचे औचित्य साधून  गोक्षेत्र प्रतिष्ठानसाठी ५१०००/-  रुपये पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.तसेच सर्व कार्यकर्त्याना देखील कोणताच कार्यक्रम न घेण्याचे आवाहन करून जनतेच्या मदतीसाठी विधायक कार्य करण्याचे सूचित केले.दरम्यान कोरोनाचे अतिशय मोठे संकट आपल्या देशापुढे उभे ठाकलेले असल्याने जनतेने शासन व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत १४ एप्रिल पर्यंत घरातच थांबून आपल्या कुटुंबाचे,आपल्या गावाचे,आपल्या जिल्ह्याचे,आपल्या राज्याचे व आपल्या देशाचे रक्षण करावे अशी आग्रही विनंती माजी आमदार शिरीषदादा चौधरींनी केली आहे.या प्रसंगी गटनेते बबली पाठक,धनु भाऊ महाजन, बाळासाहेब संदानशिव, किरण गोसावी,किरण बागुल, पंकज चौधरी, आबू महाजन व कार्यकर्ते उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.