आमदार अनिल पाटील व आय.एम.ए आयोजित रूग्ण तपासणी शिबिराचा समारोप

--------------------------------------------------------------------------
          - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------------
अमळनेर -
येथील आय.एम. ए. या डॉक्टर्स असोसिएशन  व आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने गेल्या ७ दिवसापासून साने गुरुजी शाळेत सुरू असलेल्या कोरोना आजाराविषयी रूग्ण तपासणी  शिबिराचा समारोप दि. २ एप्रिल रोजी आमदार अनिल पाटील,उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ, न.पा.च्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्या उपस्थितीत झाला
       या वेळी आमदार पाटील  म्हणाले की, शिबिरात अंदाजे १००० च्या वर रूग्णांची मोफत तपासणी अमळनेरातील सर्व  प्रसिद्ध डॉक्टरांच्या सहकार्याने  करण्यात आली. शिबिरात रुग्णांची संख्या प्रत्येक दिवस वाढत होते परंतु शहरातील 
सर्व एम.डी. डॉक्टर्स यांच्या मदतीने सुरू असलेल्या शिबिरात सर्दी,ताप रुग्णांना विषाणूंचा इतरत्र संसर्ग न होता लवकर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करून गेल्या ७ दिवसात १००० च्या वर रुग्णांची तपासणी डॉ. अविनाश जोशी,डॉ. संदीप जोशी, डॉ. निखिल बहुगुणे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. किरण बडगुजर,नगरपालिका रुग्णालयाचेे डॉ. राजेंद्र शेलकर,फार्मासिस्ट महेश जोशी यांनी केली.यात बाहेरून आलेल्या व स्थानिक लहान मुलांना तपासणीसाठी बालरोग तज्ञ डॉ.नितीन पाटील,डॉ.संदीप जोशी,डॉ. विनोद पाटील,डॉ. शरद बाविस्कर यांनी रुग्णांची तपासणी केली.या शिबिराला मोलाचे सहकार्य हे अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड,नगराध्यक्ष सौ पुष्पलता पाटील,मा.आ. कृषीभूषण साहेबराव पाटील,गटविकास अधिकारी संदीप वायाळ,तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी,नगरसेवक राजेश पाटील,व कर्मचारी यांचे लाभले.नगरपरिषद तर्फे तपासणी खोल्या दररोज सॅनिटायझर करण्यात येत होत्या.तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.प्रकाश ताडे,कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्याच प्रमाणे प्रांताधिकारी,तहसीलदार महसूल कर्मचारी सर्वांचे सहकार्याने लोकांमधील असलेली कोरोना आजाराविषयी भीती या शिबिरामुळे निश्चितच कमी झाली.
 शिबिरामुळे सर्दी तापावर नियंत्रण मिळवण्यात यश येऊन एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.भविष्यात जर गरज भासली 
तर डॉक्टरांशी विचारविनिमय करून पुन्हा अशा प्रकारचे शिबीर घेतले जाईल असे आश्वासन या वेळी आमदार अनिल भाईदास  पाटील यांनी जनतेला दिले.
-----------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.