भाजपाचा ४० वा स्थापना दिन वैयक्तिक उपक्रमांनी उत्साहात साजरा स्व.भाजपा नेते उदय वाघांच्या आठवणीने नेते- कार्यकर्ते भावुक

------------------------------------------------------------------------------ 
              - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------------
अमळनेर -
भारतीय जनता पार्टीचा ४० वा स्थापना दिन आज देशभर विविध वैयक्तिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा आदेश दिलेला आहे. नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे अशा सुचना असल्याने पक्षाने कार्यकर्त्यांना आपल्या घरीच व्यक्तीगत कार्यक्रम करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार   भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर पक्ष ध्वज लावला.
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
          अमळनेर येथेही आज भाजपा स्थापना दिनानिमित्त आमदार स्मिताताई वाघ यांनी कुटूंबा समवेत घरी ध्वजारोहण केले.यावेळी भारतीय जनसंघाचे  संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी,पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे,सरचिटणीस राकेश पाटील,विजय राजपूत,राजेश वाघ,चंद्रकांत कंखरे,राहुल चौधरी,रावसाहेब पाटील,सौरभ पाटील यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मिता ताईंनी कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीवर साधला संवाद
     यावेळी आमदार स्मिताताई वाघ यांनी स्थापना दिनाचे औचित्य साधत जिल्हा व तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला. त्यावेळी अनेक कार्यकर्ते बोलताना भावनाविवश झालेले पहायला मिळाले.ज्यांनी आम्हाला भाजपाशी जोडले, त्याग,पक्षनिष्ठा आमच्यात रोवली, असे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष स्व.उदय वाघ यांच्या आठवणींना यानिमित्ताने त्यांनी आमदार स्मिताताई यांच्याशी बोलतांना   उजाळा दिला
जिल्हाध्यक्षांचा स्मिता ताईंना फोन
             भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष व माजी खासदार हरिभाऊ जावळे आणि भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.  सुनील नेवे यांना आजच्या दिवशी पक्ष कार्यात स्वर्गीय उदय वाघ यांनी दिलेल्या योगदानाची आठवण झाल्याने श्री जावळे व  प्रा. नेवे यांनी आमदार स्मिताताईंशी संवाद साधत आपले मन मोकळे केले
-------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.